गोंदिया : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली येथे दि. १० जून २०२३ रोज शनिवारला सकाळी १०.१० वाजता माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० ते ०२.३० वाजेपर्यंत महिला करीता आरोग्य शिबीर संपन्न होईल.
*दुपारी ०३.०० वाजता बैठक*
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा व तालुका बूथ प्रमुख यांची संयुक्त सभा राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. तरी वरील सर्व कार्यक्रमांना जिल्हा कार्यकरणीचे पदाधिकारी सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष सर्व जिल्हा व तालुका बूथ प्रमुख, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महीला राष्ट्रवादी काँग्रेस, युवक, युवती, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, ओबीसी सेल, किसान सेल सहित सर्व सेल चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनें ऊपस्थित रहावे, ही विनंती.