Saturday, September 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थी सुवर्णपदकाने होणार सम्मानित

विद्यार्थी सुवर्णपदकाने होणार सम्मानित

गोंदिया : शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 117 व्या जयंती निमित्त गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक प्रदान करण्यासाठी 9 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात सुवर्णपदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सुवर्ण पदक वितरण समारंभात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. सुवर्णपदक वितरण समारंभात कार्यक्रमांचे उद्घाटक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली करतील. प्रमुख अतिथी म्हणून लोकमत समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा, उद्योगपती सज्जन जिंदल, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ उपस्थित राहणार आहेत. सुवर्ण पदकाने सम्मानित होणाºया विद्यार्थ्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यात एसएससीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारी गुजराती नॅशनल शाळेची विद्यार्थिनी नक्षत्रार बावनकर व शारदा कॉन्व्हेंटची वेदी बिसेन, इयत्ता बारावीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारी आस्था बिसेन, दहावीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारा अमन अग्रवाल, बी.ए. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारा अलदिप डहाट, बी.कॉम. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारी प्रगती चटवानी, बी.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारी काजल चौहान, बी. फार्मसीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारा ओम पटले यांचा समावेश आहे. तर भंडारा जिल्ह्यात दहावीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारी तन्वी तलमले, बारावीत सर्वाधिक गुण प्राप्त करणारा नमीत व्यवहारे, बी.ए. मध्ये सर्वाधिक गुण मिळणारा शुभम ठोंबरे, बी.कॉम. मध्ये सर्वाधिक गुण मिळणारा मिहीर चकोले, बी.एससी. मध्ये सर्वाधिक गुण मिळविणारी लिन्टा टॉमसन, बी. ई. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारा प्रशांत तरोने यांचा समावेश आहे. सुवर्ण पदक वितरण समारंभास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. मनोहरभाई पटेल स्मृति समिती, श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकादमी, गोंदिया शिक्षण संस्था मार्फत वषार्ताई पटेल, माजी आमदार हरिहरभाई पटेल व माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी केले आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments