उपायुक्त राजेश पांडे यांचे प्रतिपादन
गोंदिया : विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा कौशल्य व कलागुण अंगी जोपासवे. अभ्यास, क्रीडा व कलागुण ही त्रिसूत्री सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत ठरणारी आहे असे प्रतिपादन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया राजेश पांडे यांनी केले. ते शासकीय वसतिगृहाच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलनात बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गोंदिया, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गोंदिया, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, (नविन) कुडवा जि. गोंदिया, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, (नविन) सडक अजुर्नी जि. गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारीला क्रिडा स्पर्धा व स्नेहसंम्मेलन आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राजेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त विनोद मोहतुरे हे होते. प्रमुख अतिथी व मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रध्यापक शशिकांत चौरे व श्रीमती सवीता बेदरकर हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा असे विनोद मोहतूरे यांनी सांगितले. शशिकांत चौरे यांनी विद्यार्थ्यांना जिवनातील क्रीडा खेळांचे महत्व पटवून दिले. श्रीमती सवीता बेदरकर यांनी सुध्दा क्रीडा व अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला 270 विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते, तसेच त्यांचे पालक सुद्धा मोठ्या संखेने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहपाल वाय.एस. सावरबांधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गोंदिया यांनी केले. उपस्थितांचे आभार डी.एस. खराबे, गृहपाल यांनी मानले.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219