गोंदिया : देवरी शहरातील प्रभाग क्र. 12 मस्कर्या चौक येथिल विवाहित महिला रिकुं हेमराज येरने (26 ) हिने घरातच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुरदैवी घटना आज दि.03 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर विवाहीतेने सासरच्या त्रासाला कटांळुन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर आत्महत्तेवेळी घरचे घरी नसल्याचेही घरच्यानीं सांगीतले आहे.
सदर घटने ठिकानी पोलिस पोहचले असुन मृत विवाहीतेला खाली उतरवीत पोलिसांनी पंचनाम्याला सुरवात केली आहे. मृतक विवाहीेतेचे शवविच्छेदन करण्यासाठी देवरी येथील रुग्णालयात पाठविन्यात येनार आहे. तर पोलिसांच्या तपासात काय निस्पन्नं होते हेही पाहने महत्वाचे ठरनार आहे.