गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव व सडक अर्जुनी या दोन बाजार समित्यांसाठी आज भर पावसात मतदान झाले.त्यानंतर झालेल्या मतमोजणीच्या निकालानुसार भाजप आघाडीने दोन्ही ठिकाणी विजय मिळविला आहे.विशेष म्ह्णजे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या पत्नी शारदा राजकुमार बडोले या सडक अर्जुनी बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी महिला राखीव गटातून रिंगणात होत्या,त्यांनी विजय मिळविला आहे.सडक अर्जुनी बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-शिवसेनेच्या पॅनलचा विजय झाला आहे.यामध्ये या युतीने 18 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत.यात 9 राष्ट्रवादी,1 शिवसेना आणि 7 जागा भाजपने जिंकल्या आहेत.तर एक अपक्ष निवडून आले आहे.
तर गोरेगाव बाजारसमितीवर भाजप काँग्रेस राकाँ च्या किसान सहकार पॅनलने एकहाती विजय मिळविला.विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी बाजार समितीचे सभापती मलेश्याम येरोला यांचा पराभव झाला असून भाजप समर्थित अपक्ष उमेदवार महेंद्र ठाकूर हे विजयी झाले आहेत.भाजपप्रणीत किसान सहकार पॅनलने 18 पैकी 16 जागा जिंकल्या.
सडक अर्जुनी येथे नाना पटोले यांच्या गटाला सहकार क्षेत्रापासून लांब ठेवण्याकरिता भाजपा – राष्ट्रवादी – शिवसेना अशी अभद्र युती झाली या युतीने काँग्रेसला पराभूत करीत विजय मिळविला आहे. तर गोरेगाव बाजार समितीत भाजपा-काँग्रेस-राकाँ विरुद्ध काँग्रेस,राकाँ-शिवसेना असा सामना तालुका खरेदी विक्रीच्या निवडणुकीसारखाच रंगला.काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गप्प राहण्याच्या भूमिकेमुळे गोरेगावात काँग्रेस दुभगंली गेली आणि भाजपप्रणित आघाडीला विजय मिळाला.
सडक अर्जुनी बाजार समितीच्या निवडणुकीत शारदा राजकुमार बडोले(भाजप), अस्मिता अशोक मेंढे (राष्ट्रवादी), खेमराज देशमुख (राष्ट्रवादी), विलास बागळकर(भाजप),रतीराम शितकु कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस),हरीश देवराम बनसोड(भाजप),देवानंद सदाशिव वंजारी (भाजप),अविनाश काशिवर राष्ट्रवादी काँग्रेस ( अविरोध निवड ),रामकृष्ण गणपत नान्हे (राष्ट्रवादी काँग्रेस,अविरोध)दुर्वास गहाणे(राष्ट्रवादी)दामोदर बोपचे(राष्ट्रवादी) निवड,हेमंत कोरे(भाजप)हर्ष मोदी (भाजप),ज्ञानेश्वर उर्कुडा रहांगडाले (राष्ट्रवादी),राजू हेडाऊ (शिवसेना) हे विजयी झाले.
गोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत गोरेगाव बाजारसमितीवर भाजप काँग्रेस राकाँ च्या किसान सहकार पॅनलचे ग्रामपंचायत गटातून तेजेंद्र हरिणखेडे,नुमानचंद चौधरी,नरेंद्र रहागंडाले,महिला गटातून शशीताई फुंडे,अडते व्यापारी व हमाल गटातून गोपाल ठाकूर,योगराज पटले,राजेश ताराम, तर कैलास डोगंरे,गिरधारी बघेले,दसाराम साऊसकर (अविरोध),सेवा सहकारी गटातून किशोर गौतम,मोहन ठाकरे,योगराज पारधी,उकराम बिसेन,संजय भगत,संतोष रहागंडाले,अपक्ष महेंद्र ठाकूर तर सहकार परिवर्तन पॅनलच्या डिलेश्वरी तिरेले या महिला गटातून एकमेव विजयी झाल्या.
सडक अर्जुनी बाजार समितीवर राँका-भाजप-सेना तर गोरेगावात भाजपप्रणीत पॅनलचा विजय
RELATED ARTICLES