Tuesday, April 22, 2025
Google search engine
HomeUncategorizedसराईत गुन्हेगारास जिल्ह्यातून 1 महिन्याच्या कालावधी करीता केले हद्दपार

सराईत गुन्हेगारास जिल्ह्यातून 1 महिन्याच्या कालावधी करीता केले हद्दपार

राजकुमार शिवशंकर विश्वकर्मा वय 28 वर्षे रा. पैकणटोली, सावराटोली गोंदिया असे हद्दपारीत सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

गोंदिया: गोंदिया शहर पोलिस ठाणे परिसरातील सराईत गुन्हेगार राजकुमार शिवशंकर विश्वकर्मा वय 28 वर्षे रा. पैकणटोली, सावराटोली गोंदिया याचेविरुद्ध पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे , दुखापत करणे , शिवीगाळ करणे, चोरी, जबरी चोरी करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, अश्याप्रकारचे विविध कलमाखाली गंभीर 4 गुन्हे दाखल आहेत. पोलीस ठाणे गोंदिया शहर पोलीसांनी नमूद सराईत गुन्हेगार जाब देणार विरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्याचे चारित्र्यात आणि सवयीत कसलीही सुधारणा झालेली नाही. सदर गुन्हेगार हा सवयीचा मंगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होवून त्याच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने आणि सर्व सामान्य जनतेला नागरिकांना भयमुक्त जिवन जगता यावे यासाठी त्याचेविरूद्ध पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस ठाणे गोंदिया शहर यांनी गोंदिया जिल्हा हद्दीतून नमूद गुन्हेगारास हद्दपार करणे करीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1),(अ),(ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव क्रं. 12/2024 तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे मार्फतीने प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचेकडे मंजुरी करीता सादर केलेला होता.  उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया- पर्वणी पाटील, मॅडम यांचे आदेशानुसार श्रीमती रोहिणी बानकर, मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून नमूद गुन्हेगारास गोंदिया, भंडारा, व नजीकच्या बालाघाट जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया – पर्वनी पाटील, यांनी नमूद सराईत गुन्हेगार जाब देणार यास 1 महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया भंडारा, बालाघाट जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिनांक- 02/07/2024 रोजी पारित केले असून सराईत गुन्हेगारास आदेश प्रत तामील करून गोंदिया जिल्ह्यातून 1 महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया – पर्वणी पाटील, यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. सदरची कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर, मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून यापुढेही पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे निर्देश मार्गदर्शनात अवैध कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांना असे आवाहन करण्यात येत आहे की, अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंदयापासून परावृत्त होवून ईतर वैध रोजगाराकडे वळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments