Wednesday, February 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्पर्धात्मक युगात खेळ व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली : जि. प. अध्यक्ष भेंडारकर

स्पर्धात्मक युगात खेळ व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली : जि. प. अध्यक्ष भेंडारकर

गोंदिया : खेळ विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना, निर्णय क्षमता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी हे गुण निर्माण करतात. मैदानावर शिकलेले धडे आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहतात. आजच्या स्पर्धात्मक काळात अभ्यासाबरोबरच खेळ हीदेखील व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथे मंगळवारी (दि. ९) आयोजित बाक्टी केंद्राच्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, पंचायत समिती सदस्य पुष्पलता दृगकर, होमराज पुस्तोडे, माजी उपसभापती प्रमोद लांजेवार, बाक्टी ग्रामपंचायतच्या सरपंच सरिता राजगिरे, भिवखिडकीचे सरपंच धनराज कांबळे, उपसरपंच नीलकंठ बोरकर, मनोहर मोटघरे, केंद्रप्रमुख मेश्राम, बेनिराम भानारकर, गहाणे, पोलिस पाटील मोसमी बोरकर, सीमा नानवटे, गीता खुणे, शुभांगी सोनवाणे, जयश्री येरणे, विलास गुढेवार, एल. एन. बनसोड, प्रमोद डोंगरवार, एच. एस. मेश्राम, के. के. बोरकर, राजू कापगते, पप्पू नेवारे, मोरेश्वर मेश्राम, सारिका लांजेवार, निर्मला गेडाम उपस्थित होते. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची आणि पुढे जाण्याची सुंदर संधी उपलब्ध झाली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते आणि त्यांची सर्वांगीण प्रगती घडते. असे विचार आपल्या भाषणातून उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments