गोंदिया : शेतीमाल विक्री व्यवस्थेत शेतकरी लुटला जातो ही बाब सर्वस्तृत आहे. त्याला शासनाचे काही धोरण कायदे जबाबदार आहेत. आज धानाच्या या कोठारात शेतकरी नागावला जात आहे. शेतकऱ्यांचा धान तोडणीला येऊन जमा झाले असताना अजूनही शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. ही बाब ओळखून बाजार समिती अर्जुनी मोर. च्या संचालक मंडळांनी साधारणता पंधरा वर्षापासून बंद पडलेली धान खरेदी दि.6 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंधरा वर्षानंतर शेतकऱ्यांचा माल बाजार समितीच्या यार्डात विकला जाणार आहे. काहीसा दिलासादायक निर्णय बाजार समितीच्या वतीने घेण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासन स्तरावर धान खरेदीच्या प्रश्नावर केवळ बैठकावर बैठका होत आहेत. निर्णय मात्र घेतला जात नाही.जाचक नवीन नियम व अटीच्या परिणामी खरेदी संस्थानी धान खरेदी करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे धान खरेदी प्रभावित झाली आहे. सर्वाधिक धान लागवड असलेल्या आणि धाणाचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या या भागात शेतकऱ्यांची होत असलेली दैना अवस्था काळजाला छेद पाडणारी आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या दिवाळीत शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोर च्या वतीने धान खरेदी सुरू होत आहे. शेतकरी हलक्या धानाच्या विक्रीतून दिवाळी साजरी करतो. पण जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने मुदतीच्या दोन महिन्यानंतरही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. ही नामी संधी साधून व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटल कमी दराने व्यापा-यांनी धान खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाचे सहा आणि मार्केटिंग फेडरेशन चे 12 असे एकूण 18 धान खरेदी केंद्र आहेत. पण अद्यापही आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाले नाही. सरकारने धनासाठी 2183 रुपये हमीभाव निर्धारित केला. पण दिवाळीच्या तोंडावर खरेदी सुरू न झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी गावागावात जाऊन भाव पाडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपये दराने तोटा सहन करावा लागत आहे. या सर्व विवंचणेतून आता शेतकरी वाचणार आहे. शेतकऱ्याला वाहतुकीचा खर्च बसतो त्यासोबतच हमालीच्या नावाने खरेदी केंद्रांमध्ये भुर्दंड द्यावा लागत आहे. आता त्या उलट बाजार समितीच्या सेस फंडातून शेतकऱ्यांच्या गावाच्या अंतरावर आधारित हमाली आणि वाहतूक भाडा प्रति क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. काही व्यापारी शेतकऱ्यांकडून धान घेऊन चुका-यासाठी ताडकळत ठेवायचे ही समस्या दूर करून शेतकऱ्यांच्या मालाला चुकारा हा पाच दिवसाच्या आत मध्ये अदा केला जाईल याची हमी कृषी उत्पन्न बाजार समितीची असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगावच्या यार्डात आपले धान विक्री करण्याचे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंतराव परशुरामकर तसेच संचालक मंडळाने केले आहे.
१५ वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत ६ नोव्हेंबर पासुन सुरु होणार धान खरेदी
RELATED ARTICLES