६ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने गोंदिया व सडक अर्जुनी येथे पक्ष कार्यकारिणी बैठकीचे आयोजन

0
201

गोंदिया : विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मा.खा.श्री प्रफुल पटेलजी, श्री सुनिल तटकरे जी प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री श्री धर्मरावबाबा आत्राम, श्रीमती रुपालीताई चाकणकर महिला प्रदेशाध्यक्षा, श्री सुरज चौहान युवक प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर हे ०६ नोव्हेंबर ला गोंदिया जिल्हयात पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दि ०६/११/२०२३ ला सकाळी ११.०० वाजता एन एम डी महाविद्यालय सभागृह गोंदिया येथे पक्ष कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच दि ०६/११/२०२३ ला दुपारी ०२.०० वाजता आशीर्वाद लॉन, शेंडा रोड, सडक अर्जुनी येथे पक्ष कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमांना पक्षातील सर्व सेल व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक, सरपंच व ग्रामपंचायत चे सदस्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here