Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedअकरा वर्षात ‘108’ रुग्णवाहिका ठरली 19.64 लाख रुग्णांची जीवनदायिनी

अकरा वर्षात ‘108’ रुग्णवाहिका ठरली 19.64 लाख रुग्णांची जीवनदायिनी

गोदिया : घर,टोला,गाव,वस्ती,पाडा व हाय-वे पासुन आरोग्य संस्थेत पोहोचविण्याचे काम 108 रुग्णवाहिका चालक करीत आहेत.अति गंभीर रुग्णाला रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात अत्यावश्यक वेळेत नेण्याचे काम सुद्धा रुग्णवाहिकामार्फत केले जात आहे.रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाने 1 मार्च 2014 पासुन सुरू केलेल्या ‘108’ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा तब्बल 196429 रुग्णांनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.जिल्ह्यात गेल्या 11 वर्षांत 108 रुग्णवाहिकेचे वाहन चालक अथक व जिवाची पर्वा न करता जिल्ह्यातील 1 लाख 96 हजार 429 रुग्णांना सेवा दिली आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिका ही जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरली आहे.
जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 एएलएस तर 12 बीएलएस कंपनीच्या अशा एकूण 15 रुग्णवाहिका सेवेत आहेत त्यासाठी जिल्हा व्यवस्थापक डॉ.प्रदीप मडावी यांचे भरीव योगदान मिळत आहे. अगदी मोफत पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे अपघातग्रस्त,बाळंतपणासाठी अडलेल्या महिला,विषबाधेसह इतर सर्वच प्रकारची वैद्यकीय मदत नागरिकांना वेळेत पोहोचू शकल्याने अनेकांना नवजीवन देण्याचे काम त्यामुळे साध्य झाले आहे.108 क्रमांकावर कॉल केल्यास अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेली रुग्णवाहीका पेशंटच्या सेवेसाठी सुवर्णकाळात हजर होत आहे.अॅम्ब्युलन्समधील मशीनरीच्या सहाय्याने गोल्डन अवर्समध्ये पेशंटना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापूर्वी आवश्यक उपचार मिळतात.त्यामुळे घटनास्थळापासून हॉस्पिटलपर्यंत पेशंटना स्वस्थता लाभत आहे.जीपीआरएस’ प्रणालीमुळे कॉल आल्यास संबंधित डॉक्टरांना कळवून अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल होत असल्याचे जिल्हा समन्वयक स्वाती पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यात 15 रुग्णवाहिका कार्यरत असून सकाळ आणि रात्र सत्रांत वाहनचालक व वैद्यकीय अधिकारी त्यासाठी आरोग्य सेवा देत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे. या सेवेचा दळणवळणासाठी जिकिरीच्या ठरणाऱ्या व अतिदुर्गम भागांमधील नागरिकांसह तालुका आणि शहरी भागातील नागरिकांसाठी ही सेवा मोफत असते. वैद्यकीय तातडीच्या वेळी 108 क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेची मदत घेता येते.प्राथमिक आरोग्य केंद्रउपजिल्हा रुग्णालयेग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णवाहिका उपलब्ध असतात.फोन कॉल झाल्यानंतर कमीत कमी वेळेत रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचते.या सेवेबाबत जिल्ह्यात जनजागृती होत असूनवापरही वाढत आहे. रस्ता अपघात किंवा इतर कुठला अपघात,आग लागून कुणी भाजलेअचानक हृदयविकाराचा झटका आला किंवा एखाद्या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यावर ‘108’ डायल कर ना भाऊअसेच अनेकांच्या मुखातून बाहेर पडते.एकूणच आपत्कालीन परिस्थितीत अनेकांना डायल 108’ रुग्णवाहिका सेवेची आठवण येत असून,आता पर्यंत जिल्ह्यात तब्बल 196429 गरजूंनी आरोग्य विभागाच्या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे.

जिल्ह्यात १५ रुग्णवाहिकांद्वारे वैद्यकीय सेवा
या योजनेंतर्गत जिल्ह्यात 15 अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका सध्या के.टि.एस. सामान्य जिल्हा रुग्णालयबाई गंगाबाई स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय तिरोडा,ग्रामीण रुग्णालय देवरी,ग्रामीण रुग्णालय आमगाव,ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी,ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव,ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध,ग्रामीण रुग्णालय गोरेगाव,ग्रामीण रुग्णालय सौंदड,ग्रामीण रुग्णालय चिचगड,ग्रामीण रुग्णालय सालेकसा,ग्रामीण रुग्णालय रजेगाव,प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी,प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा या ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
0

गोंदिया जिल्ह्यात 15 रुग्णवाहिका आहेत.रुग्णांना योग्य सुविधा देणे हे आपले कर्तव्य समजुन अहोरात्र 108 ची रुग्णवाहिका व वाहन चालक आरोग्य सेवा देण्याचे काम करीत आहेत.काहीवेळा रुग्णवाहिका येण्यास विलंब लागत असतो.ही अडचण असली,तरी रुग्णाला दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असतो.रुग्णाचा जीव वाचविणे हेच प्रथम कर्तव्य समजुन रुग्णाला धोक्यातुन बाहेर काढ्ण्याचा एकमेव ध्यास घेवुन कार्य करित आहोत.
-स्वाती पाटील, जिल्हा समन्वयक

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments