गोंदिया : दोन दिवसापासून घरून लापता असलेल्या महिलाचा मृतदेह 19 जून 2025 रोज गुरुवार च्या सकाळी 7 वाजे दरम्यान देवरी तालुक्यातील ग्राम गोटाबोडी शिवारातील टाटेकसा येथील नाल्याच्या पाण्यात तरंगताना आढळल्याने, गोटाबोडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक महिलेचे नाव कुंदाबाई भैय्यालाल राऊत (वय ४७) रा. गोटाबोडी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक महिला ही मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. सदर महिला मंगळवारच्या रात्रीपासून घरून बेपत्ता होती. कुटुंबातील तसेच गावातील नागरिकांनी महिलेचा चारही दिशेला शोधाशोध केला. पण शोध लागला नाही. अखेर गुरुवारी काही महिला सकाळी ग्राम गोटाबोडी शिवारातील टाटेकसा परिसरातील नाल्यावर कपडे धुवायला गेल्या होत्या. त्यातच त्या महिलांना नाल्याच्या पाण्यामध्ये एका महिलेचा मृत्यूदेह तरंगताना दिसला. याची माहिती वाऱ्यासारखी गावांमध्ये पसरली. गावकरी मृतदेहाची ओळख पटवून खात्री करण्याकरिता घटनास्थळी दाखल झाले. सदर महिला ही गोटाबोडी गावातील आहे अशी खात्री करून घेतली. घटनेची माहिती देवरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय देवरी येथे शवविच्छेदनासाठी मृतदेहाला पाठविण्यात आले. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.
त्या बेपत्ता महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू, देवरी तालुक्यातील गोटाबोडी येथील घटना
RELATED ARTICLES