गोंदिया : काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी जाहीर केली असता गोंदिया जिल्यातील विद्यमान आमदार सहसराम कोरोटे यांची तिकीट कापली तर जिल्ह्यातील कॉग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड यांना अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिल्याने स्थानिक नेत्यांना डावलून तिरोडा विधानसभा क्षेत्रातुन पार्सल पाठवीत आमच्यावर अत्याचार केल्याचे कॉग्रेस कार्यकर्त्यांनी आणी मुलाखती दिलेल्या उमेदवारानी सांगितले आहे. तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात पार्सल रुपी दिलेला उमेदवार वापस घेऊन स्थानिक नेत्यांना निवडूनक लढविण्याचे प्राधान्य द्यावे अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेतली असून जर नाना पटोले यांनी या संदर्भात योग्य निर्णय घेतला नाही. तर मुलाखाती दिलेलेल्या 15 उमेदवारान पैकी एक उमेदवार दिलीप बनसोड यांच्या विरुद्ध अपक्ष लढवू अशी भूमिका कॉग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यात अजय लांजेवार, राजेश नंदागवळी, दिनेश हुकरे, पुष्पा खोटेले, सह शेकडो कार्यकर्ते पत्रकार परिषदेला २७ ऑक्टोंबर रोजी उपस्थित होते. पार्सल हटाव काँग्रेस बचाओ चे नारे यावेळी लावण्यात आले.
अर्जुनी मोरगाव विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांची बंडखोरी, पार्सल हटाव काँग्रेस बचाओचे लागले नारे
RELATED ARTICLES