अवैध जनावरांची तस्करी करणारा वाहन जप्त तर चालक फरार

0
197

देवरी पोलिसांनी केला अंदाजे पाच लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : देवरी तालुक्यातील मुरदोली गावाजवळ 12 बैल कोंबून भरलेला ट्रक देवरी पोलिसांनी (दि. 05 जुलै2025) रोजी पहाटे 7.30 वाजता दरम्यान पाठलाग करून ताब्यात घेतला आहे. MH 40 D 6035 क्रमांकाची महेन्द्रं पिकप आमगाव आदर्श – मुरदोली मार्गे सुसाट वेगाने देवरी महामार्गाकडे जाताना गस्तीवर असलेले पोलिसानां दिसला. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला. वाहनाच पाठलाग सुरू केला. ताडपत्री झाकून असलेला ह्या ट्रकला देवरी तालुक्यातील महामार्गावरील मुरदोली गावाजवळ शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतला तोपर्यंत चालक पसार झाला होता.

वाहनास 12 जनावरे असा अंदाजे पाच लक्ष रुपयांचा मुद्देमाल देवरी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये देवरी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास सुरूवात केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक प्रविन डांगे यांच्या मार्गदर्शनात पो.ह. परसमोडे, चालक पो.ना. पंकज पारधी, पो.सी. अनिल ऊईके , पो.सी. विनोद बिसेन यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here