Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedआंतरराज्यीय चोरांच्या टोळीस अटक

आंतरराज्यीय चोरांच्या टोळीस अटक

गुन्ह्यांतील चोरीस गेलेला किंमती 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

गोंदिया : फिर्यादी श्री. थानसिंग बसेने, रा. रतनारा यांचे घराशेजारील शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे ट्रॉली मध्ये ठेवलेले धानाचे 24 बोरे ट्रॉलीसह दि. 02. 03. 2023 चे रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयानी चोरुन नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोस्टे. दवनीवाडा येथे  अप. क्र. 44/ 2023 कलम 379 भादंवि. प्रमाणे नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.प्रमोद मडामे यांनी गुन्ह्यातील गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत तसेच मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सूचना केल्या होत्या.

या अनुषंगाने गुन्हा नोंद झाल्यापासुन गोंदिया जिल्हा पोलीस पथक अज्ञात आरोपीचा व मुद्देमाल चा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक आणि दवणीवाडा पोलीसांनी याबाबत परंपरागत व तांत्रीक पध्दतीने तपास करत धानाने भरलेली ट्रॉली चोरणारे टोळीचा पर्दाफाश करत आरोपी मनीष ऊर्फ जयराम धर्मदास सेवईवार, रा. बलमाटोला, ता. जि. गोंदिया, रमेश रायसींग कुंभरे, रा. बिजेपार, ता. कोरची, जि. गडचिरोली, देवलाल ऊर्फ देवा सहीतराम चंद्रवंशी, रा. बागरेकसा, ता. डोंगरगढ, जि. राजनांदगांव (छत्तीसगढ,), नरसिंग ऊर्फ नरेश मिलाप वर्मा, रा. विचारपुर, ता. छुईखदान, जि. खेरागढ़ (छत्तीसगढ), श्रवण राधेलाल वर्मा, रा. हिरापुर, ता. डोंगरगढ, जि. राजनांदगांव (छत्तीसगढ) यांना महाराष्ट्र तसेच छत्तीसगढ राज्यातुन मोठया शिताफीने अटक करुन त्यांचेजवळुन गुन्हयात चोरलेली ट्रॉली किंमती 80,000/- रूपये व 9 क्विंटल धान किंमती 20,000/- रुपये असा एकूण 1 लाखाचा मुद्देमाल आरोपी यांचे पासून आजपर्यंत केलेल्या तपास दरम्यान स्था.गु.शा. व दवणीवाडा पोलीस पथकाद्वारे संयुक्तंरित्या परिश्रम घेवून हस्तगत करण्यात आलेला आहे.  सदरची कार्यवाही मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, मा. श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा, श्री. सतीश जाधव, पोलीस निरीक्षक,पो.स्टे.दवनीवाडा,श्री. दिनेश लबडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे. दवनीवाडा चे पोउपनि श्री. महेश विघ्ने, सपोनि -पाटील, पोउपनि श्री. सुखदेव राऊत, सफौ. देवराम खंडाते, पोहवा. मिल्कीराम पटले, पोहवा. सोमेंद्रसिंग तुरकर, पोहवा. रियाज शेख, लक्ष्मण बंजार, संतोष केदार, नरेश नागपुरे, गणेश ठाकरे, राजेश दमाहे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहवा. मिलकीराम पटले करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments