संधी-साधु समाजकंठकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : आदिवासी गोंड गोवारी समाजाचे पत्रकार परिषदेत जाहीर आव्हान
गोंदिया : आदिवासी गोंड गोवारी जमात सविधान हक्क संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र च्या वतीने सर्व संविधानिक गोंड गोवारी आपल्या जमातीच्या न्याय हक्काच्या मागणी करीता गेल्या 25 वर्षापासुन संघर्ष कृती समिीतीच्या माध्यमातुन शासनाविरुद्ध लढा उभारलेला आहे.त्या अंतर्गत विधान सभेवरील भव्य मोर्चा, 17 व 13 दिवस असे दोन टप्यात आमरण उपोषण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चौक, नागपूर येथिल रस्ता रोको आंदोलन ठिय्या आंदोलन व दिनांक 27 सप्टेंबर 2024 चा आयुक्तालय नागपुर येथिल भव्य मोर्चा असे लोकशाही मार्गाने अनेक ऐतिहासिक व भव्य आंदोलने केली. शासनाला संविधानिक पुराव्यनिशी वेळोवेळी निवेदने दिली. वेळोवेळी शासनाशी बैठकी झाल्या पंरतु शासनाने प्रत्येक वेळी के.एल.वडणे समितीचा आधार घेऊन वेळकाढु धोरण स्किाकारुन व शेवटी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताना आपल्या सविंधानीक मागणीली फाटा देवुन 15ऑक्टोंबर 2024 ला महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्ग मंत्रालयातुन एक शासन निर्णय काढला त्यामध्ये ज्या आपल्या मागण्याच नाही त्या अपमानजनक तरतुदी मान्य करत असल्याचे नमुद करुन गोंड गोवारी जमातीच्या सविंधानीक हक्काच्या मागण्यांचा घोर अपमान केला.
आदिवासी गोंड गोवारी संघटने मार्फत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सामूहिक रित्या बहिष्कार केला असून तो बहिष्कार कुठेही मागे घेण्यात आलेला नाही. सदर बहिष्कार मागे घेतल्याचे वृत्त काही संधी – साधू समाजकंटकांकडून स्वः स्वार्थापोटी पसरविण्यात येत आहे. हे सर्रास खोटे आहे. मतदानाच्या संदर्भात जनजागृती केल्यास त्यांच्यावर समाजाचा बहिष्कार असेल असाही गैरसमज संधी साधूंनकडून करण्यात येत आहे हे सर्रास खोटे आहे. असा कुठलाही निर्णय संघटनेमार्फत घेण्यात आलेला नाही मात्र निवडणुकीवरील बहिष्कार कायम आहे. हे नक्की असे संघटनेमार्फत जाहीर करण्यात आलेले असताना सुद्धा समाजाला बदनाम करण्याचा काम काही निवडक लोकांकडून करण्यात येत आहे याचे खंडन समाज संघटने कडून जाहीररीत्या करण्यात येत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील 23 आदिवासी गोंड गोवारी संघटना मार्फत विधानसभा निवडणुकीवर जाहीर बहिष्कार असल्याचे करण्यात आले. त्यामुळे समाज बांधवांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व गोंधळात पडू नये असे पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीररीत्या समाजाला आवाहन केले आहे.
संघटने द्वारा आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना संघटनेचे पदाधिकारी दिनेश कवरे अध्यक्ष आदिवासी गोंडगोवारी जमात तालुका सालेकसा, बंडु वाघाडे, भुमेश्वर नेवारे, रुपचंद नेवारे, मंगेश राऊत संजय राऊत, भागेश्वर आंबेडारे, सुरेश वाघाडे, पुरुषोत्तम फुंने, यशवंत शेंदरे, आंनंद शहारे, चंद्रपाल नेवारे, साहील राऊत, राजकुमार राऊत, पिंटू राऊत, हेमराज येसनसुरे, प्रकाश राऊत, सुभाष शहारे, खोमेश कोहरे, युवराज कृपाले, हंसराज ठाकरे ,राजेंद्र वघारे, अनिल शहार, प्रकाश नेवारे, रमेश राऊत, मोतीलाल भंडारी, अजय कृपाले, सुभाष राऊत, अमतलाल चौधरी, गुणीराम राऊत, सिताराम वघारे, रमेश चौधरी, हरीलाल राऊत, सोभेलाल चौधरी, राजकुमार नेवारे बिंझली नंदकिशोर चौधरी या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या संघटनेची भूमिका स्पष्टरित्या जाहीर केलेली आहे.
आदिवासी गोंड-गोवारी जमातीचा चुनावी बहिष्कार कायम
RELATED ARTICLES