शासकीय आश्रम शाळा पुराडा येथे आनंद मेळावा उत्साहात
गोंदिया. व्यावसायिकदृष्ट्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून बालकांना शाळेमधूनच व्यवसायाची सवय लागते. व्यवसाय ज्ञान,आर्थिक ज्ञान व लोकांशी बोलण्याची कला विद्यार्थ्यांना आनंद मेळाव्याच्या माध्यमातून अवगत होत विद्यार्थ्यांच्या फायदा होत असतो.आदिवासी विद्यार्थी भविष्यात व्यावसायिक होण्यासाठी अश्या मेळाव्याची अत्यंत आवश्यकता आहे असे प्रतिपादन उद्घाटक म्हणून बोलताना जिल्हा परिषद सदस्या सविताताई यांनी केले.त्या
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथे आयोजित आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथे दरवर्षी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक खाद्यपदार्थांचे व वस्तूंचे स्टॉल लावले होते. प्राचार्य कमल कापसे यांनी सांगितले या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांचे 42 स्टॉल लावण्यात आलेले होते.अनेक पदार्थ या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेले होते त्यामधून हजारो रुपयांची विक्री विद्यार्थ्यांनी केली. त्या विक्रीतून मिळणारा नफा हा आपल्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग करणार असल्याचे स्टॉल लावलेले विद्यार्थ्यांनी सांगितले.मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण टप्पे,सदस्य शोभेलाल उईके, अधीक्षक अजय सोनूले, अधिक्षिका पौर्णिमा जोशी, उच्च माध्यमिक शिक्षक राजेश हट्टेवार, मेघा धोपते,वैयजंती नेणावत,वैशाली खोंडे, आशा धुर्वे, ओमप्रकाश मडावी माध्यमिक शिक्षक राजू भक्ता,सुजाता मेश्राम, पवन वंजारी, प.प्रा.शि. विजयकुमार टेंभरे , प्राथमिक शिक्षक मोरेश्वर धवणे,सुरेखा कोरे, अरविंद कुथीर ,नाईक, तसेच मंदाताई देशमुख,जयदेव भेंडारकर,मयुर राठोड,पुनम,व शाळेतील इतर सर्व कर्मचारी व मोठ्या प्रमाणात पालक विद्यार्थी या आनंद मेळाव्यात सहभागी होऊन अनेक व्यंजनांची खरेदी करून खाण्याच्या आनंद लुटला.
आनंद मेळाव्यातून विद्यार्थी व्यावसायिकदृष्ट्या प्रगल्भ होतात : सविता पुराम
RELATED ARTICLES






