Thursday, June 5, 2025
Google search engine
HomeUncategorizedआयुष्मान आरोग्य मंदिर अर्जुनी येथे टीबी मुक्त अभियान अंतर्गत निक्षय शिबीर संपन्न,...

आयुष्मान आरोग्य मंदिर अर्जुनी येथे टीबी मुक्त अभियान अंतर्गत निक्षय शिबीर संपन्न, सहव्याधी संशयित रुग्णांचे 54 मोफत एक्स-रे तपासणी

गोंदिया : 3 जुन 2025 रोजी तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ईंदोरा अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर अर्जुनी येथे टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत निक्षय शिबीर संपन्न झाले.निक्षय शिबीराचे उद्घाटन ग्राम अर्जुनी येथील सरपंच सुनिता रहांगडाले, प्राथमिक आरोग्य केंद्र ईंदोराचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य दुबे, आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र अर्जुनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकुमार हरिणखेडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र अर्जुनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवकुमार हरिणखेडे यांनी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार सन २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत टिबी वर मात करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाजातुन टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.त्या दृष्टीने जिल्हयामध्ये टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिम सुरु असुन जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत नविन क्षयरुग्णांचे शोध मोहिम राबवुन मोफत औषधोपचार देण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार थुंकीद्वारे एका रुग्णापासुन दुस-याला होत असतो.क्षयरोग हा मायक्रोबॅक्टोअिम ट्युबरक्युलोसिस नावाच्या या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत आरोग्य संस्थेत निक्षय शिबीर राबविण्यात येत असल्याचे सांगितले. टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत निक्षय शिबिराद्वारे कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येत असुन त्यामध्ये २ आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पुर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासीत, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषीत व्यक्ती, ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करण्यात येत आहे.तपासणी अंती निदान झालेल्या संशयित रुग्णांचे मोफत एक्स-रे/ थुंकी नमुने तपासण्यात येत असल्याचे सांगितले.
आयुष्मान आरोग्य मंदिर अर्जुनी येथे टीबी मुक्त भारत कार्यक्रम निक्षय शिबीरा दरम्यान कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या सहव्याधी लोकांची आरोग्य तपासणी सोबतच 54 लोकांचे निक्षय वाहन द्वारे मोफत एक्स-रे मोफत करण्यात आल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सुदिप्ता आदित्य यांनी याप्रसंगी दिली आहे.
सदर निक्षय शिबीरात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवकुमार हरिणखेडे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सुदिप्ता आदित्य,तिरोडा तालुक्याचे वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक अनुपम बंसोड, आरोग्य सेविका आशा पटले,एक्सरे टेक्निशियन चेतन बारई यांचे सह सम्पूर्ण टेक्निशियन टीम,आशा सेविका,परिचर सोबत गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments