Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्मी जवान आठ महिन्यापासून दिल्ली रेल्वे स्थानकावरून बेपत्ता, आमदार राजकुमार बडोले यांनी...

आर्मी जवान आठ महिन्यापासून दिल्ली रेल्वे स्थानकावरून बेपत्ता, आमदार राजकुमार बडोले यांनी कुटुंबीयांची घेतली भेट

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहलगाव/ कान्होली येथील चैतराम गुणील्लाल ताराम हा आर्मी जवान गेल्या आठ महिन्यापासून दिल्ली रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झाला असून अजून पर्यंत त्याचा शोध न लागल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. बेपत्ता जवानाचा शोध लावण्यास मदत करावी म्हणून त्यांचे वडिलांनी आमदार राजकुमार बडोले यांच्याकडे निवेदन देऊन शोधकार्यात मदत करण्याची मागणी केली. आमदार राजकुमार बडोले यांनी तात्काळ 24 ऑगस्ट रोजी त्यांचे घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना शोध लावण्यासाठी शक्य तेवढी मदत करून देण्याचे आश्वासन देऊन कुटुंबियांना धीर दिला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहलगाव / कान्होली येथील चैतराम गुनीलाल ताराम वय 26 वर्ष हा युवक आर्मी मध्ये इनफॅन्ड्री बटालियन युनिट मेरठ मध्ये गेल्या पाच वर्षापासून नोकरीला होता. मेरठ युनिट मधून त्याला काही दिवसासाठी अरुणाचल ला पाठविण्यात आले होते. आपले कर्तव्य बजावून पुन्हा तो मेरठ युनिटला जाण्यासाठी निघाला. दिल्ली रेल्वे स्थानकावर 12 डिसेंबर 2024 ला आला असता त्यांनी आपल्या वडिलांना फोन करून मी मेरठ युनिटला जात असल्याचे सांगितले. मात्र सदर आर्मी जवान 12 डिसेंबर 2024 पासून बेपत्ता झाला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. व तेव्हापासून त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता. या संदर्भात लष्करांकडून पोलीस ठाणे जुना दिल्ली रेल्वे स्थानक येथे हरविल्याची नोंद करण्यात आली. असून तब्बल आठ महिन्यापासून त्या जवानाचा अजून ठाव ठिकाण लागला नाही. त्यामुळे चैतराम ताराम या आर्मी जवानाचे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावात आलेले आहेत. एकमेव कमावता असल्याने ताराम कुटुंबीयांवर आर्थिक संकट सुद्धा कोसळले आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झालेल्या या आर्मी जवानाचे बॅग व साहित्य दिल्ली स्थानकावर मिळाले असून त्याचा आधार कार्ड व ओळखपत्र राजस्थान पोलिसांना मिळाल्याचे त्यांचे कुटुंबीयांनी सांगितले. आर्मी जवान ताराम यांचा शोध घेण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर तातडीची कारवाई करण्यासंदर्भात कुटुंबीयांनी आमदार राजकुमार बडोले यांच्याकडे निवेदन दिले आहे. आमदार बडोले यांनी शक्य असल्यास शोध घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन ताराम कुटुंबीयांना धीर दिला. व आपला मुलगा सुखरूप वापस यावा यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments