उभ्या बसला ट्रकची धडक, प्राणहानी नाही

0
234

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बिर्सी चौकात गोंदियावरून नागपूरकडे जाणारी बस क्रं. MH-40 M 8524 प्रवासी घेण्यासाठी व उतरण्यासाठी थांबलेली होती. तेवढ्यात तिरोडाकडून तुमसरकडे जाणाऱ्या अवजड ट्रक क्रं. MH- 35 K 5100 ने मागेहून बसला धडक दिली. त्यामध्ये बसचा मागचा भाग क्षतीग्रस्त झाला, परंतु बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास तिरोडा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here