Monday, June 2, 2025
Google search engine
HomeUncategorizedएमडी पावडर सह दोन आरोपींना अटक, देवरी पोलिसांची कारवाई

एमडी पावडर सह दोन आरोपींना अटक, देवरी पोलिसांची कारवाई

गोंदिया : देवरी पोलिसांनी मोठी कारवाई करत 1.5 ग्राम एमडी पावडर जप्त केला आहे. या कारवाईमुळे देवरी शहरातील एमडी खरेदी विक्री सुरू आहे याचेच प्रत्यंतर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. देवरी पोलीस ठाण्याच्या मुख्य बस्टॉप परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील दोन आरोपींकडे एमडी पावडर असल्याची माहिती देवरी पोलिसानां रात्री गस्ती दरम्यान मिळाली. पोलिस अधिकारी गंगाकचुर , गिता मुळे पोलिस कर्मचारी  रोशन डोळे, कादें, विशाल खांडेकर पंकज पारधी, सुधिर जांगळे , लक्ष्मण बागडे यांनी सापळा रचून दोन्ही आरोपीनां ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून 1.5 ग्रॅम  एमडी पावडर आढळली. त्या पावडरची किंमत अंदाजे 3 हजार ते 5 हजार इतकी आहे. पोलिसांनी या आरोपींकडून दोन मोबाईल फोन, मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडे एमडी पावडर कुठून आली याचा शोध पोलिस करीत आहेत. देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांचे आवाहन
अवैध धंदा आढळल्यास 112 नंबरवर कॉल करा आपल्या परिसरात दारू, मटका, जुगार, पत्त्याचा क्लब अशा प्रकारे कोणताही अवैध धंदा सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी 112 नंबरवर कॉल करावा़ ज्यांनी ही माहिती दिली त्यांनी आपले नाव सांगायची गरज नाही़ आपण संबंधित धंद्याची माहिती दिल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाकडून त्या ठिकाणी पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी रवाना होतात. ते त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात आणि याची माहिती नियंत्रण कक्षाला देतात़ धंदा सुरू असल्याचे दिसल्यास पोलिसांकडून संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाते़ तशी नोंद संबंधित पोलीस ठाण्याला केली जाते़ तसेच दिलेल्या कॉलचे काय झाले याची माहिती देखील नियंत्रण कक्षाला कळविण्याचे बंधनकारक आहे़ यावर वरिष्ठ अधिकार्यांची देखरेख असते तर नागरीकानीं सहार्य करावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments