कचारगड यात्रेला जाण्यासाठी एस.टी.महामंडळाने जाहीर केले वेळापत्रक

0
151

 गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रेत सहभागी होण्याऱ्या भाविकांसाठी एस.टी.महामंडळाच्या गोंदिया आगार व्यवस्थापकांनी एस.टी.बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गोंदिया बसस्थानकावरुन कचारगडला जाणाऱ्या बसची वेळ सकाळी 8 वाजता, सकाळी 8.30 वाजता, सकाळी 8.45 वाजता, सकाळी  9 वाजता, दुपारी 12.45 वाजता, सायंकाळी 7.30 वाजता. आमगाव बसस्थानकावरुन कचारगडला जाणाऱ्या बसची वेळ दुपारी 12 वाजता. सालेकसा येथून कचारगडला जाणाऱ्या बसची वेळ सकाळी 11 वाजता, सकाळी 11.30 वाजता, दुपारी 1 वाजता, दुपारी 4.30 वाजता. कचारगड येथून गोंदियाला येणाऱ्या बसची वेळ सकाळी 11 वाजता, सकाळी 11.30 वाजता, दुपारी 12.15 वाजता, दुपारी 3.30 वाजता, दुपारी 4.15 वाजता, सायंकाळी 5.30 वाजता. कचारगड येथून आमगावला येणाऱ्या बसळी वेळ दुपारी 1.45 वाजता. कचारगड येथून सालेकसाला येणाऱ्या बसची वेळ सकाळी 10.45 वाजता, सकाळी 11 वाजता, सकाळी 11.45 वाजता, दुपारी 12.30 वाजता, दुपारी 2.15 वाजता आहे. असे राज्य मार्ग परिवहन एस.टी.महामंडळाचे गोंदिया आगार व्यवस्थापक यतीश कटरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here