करंट लागून शेतात बापलेकांचा मृत्यू

0
295

गोंदिया. शेतामधे जनावरांच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सुरु होता.अशातच विद्युत करंट लागल्याने बापलेकाचा मृत्यु झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव शेतशिवारात 21 मार्चच्या रात्री 10 वाजता घडली.यामधे वामण दुधराम हातझाडे (वय 50) आणि मुलगा संतोष वामन हातझाडे (वय 24) दोन्ही रा.मोरगाव अशी मृतांची नावे आहेत.
आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते (वय 47 रा.मोरगाव) यांनी आपल्या मका पिकाच्या शेताभोवती लावलेल्या कुंपन तारामधून विद्युत करंट सोडल्याने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यु होण्याच्या संभव असण्याची जाणीव असताना स्वतःचे राहते घरातुन विद्युत केबल टाकून कुंपनाचे तारेला विद्युत करंट लावला. वामन दुधराम हातझाडे हा त्या शेताजवळुन रात्री 10 वाजता जात असताना विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने जागेवरच मरण पावला. तर आपले वडील आले नाही म्हणून मुलगा संतोष वामन हातझाडे हा मागोमाग गेला. वडील पडले असावे म्हणून त्यांना उचलण्यासाठी गेला असता त्यालाही विद्युत करंट लागल्याने त्याचाही घटनास्थळीच मृत्यु झाला. ही घटना मृताचे मुलीच्या लक्षात आल्याने तिने सावधगीरी बाळगून शेतमालकाला माहिती दिली. विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. दशरथ दुधराम हातझाडे यांच्या तक्रारीवरुन अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठविले. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here