कर्जाला कंटाळून पती पत्नीची चोरखमारा जलाशयात उडी घेत आत्महत्या

0
393

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशयात कर्जाला कंटाळून पती पत्नींनी उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज लोकसभेच्या पहिल्या टप्यातील मतदानाच्या दिवशी(दि.१९)घडली.तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील मुनेश्वर श्रीराम कुंभारे(वय ५०) व पत्नी सरीता मुनेश्वर कुंभारे(वय ४५) असे उडी घेणार्या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे.यांना १० वर्षाची प्रणाली ही मुलगी आहे.तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह जलाशयातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालयात हलवलेे असून तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here