कुष्ठमुक्त भारताचा संकल्प घ्या : डॉ अंबरीश मोहबे

0
191

गोंदिया : 30 जानेवारी रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन अभियान अंतर्गत स्थानिक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात स्पर्श अभियायनाचे उदघाटन करण्यात आले. प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पित केली. दोन मिनिटे मौन पाळून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांच्या केटीएसच्या सर्व स्टाफने महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पित केली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांनी उपस्थित स्टाफ यांना स्पर्श अभियान अंतर्गत कुष्ठमुक्त भारतची शपथ दिली आणि आवाहन केले की स्पर्श अभियानाला सहकार्य करा. कुष्ठरोग औशोधपचार केल्याने बरा होतो, आपल्याला महात्मा गांधी यांचे कुष्ठमुक्त भारताचे स्वप्न साकार करायचे आहे. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जैस्वाल, डॉ. सुवर्णा हुबेकर, डीपीएम वानखेडे, डॉ. मीना वट्टी, समीक्षा चिकलकर तसेच सपना खंडाईत, सारिका कांबळे, डॉ. उपाध्याय, श्री प्रशांत, निशांत बन्सोड व श्री ब्राह्मणकार, श्री बघेले व कार्यालयीन स्टाफ उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here