तिरोडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज शासनाला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असून, कोणत्याही पात्र शेतकऱी मदतीपासून वंचित राहू देणार नाही याची दखल घेण्यात येईल. असे आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
कोणताही पात्र शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित राहणार नाही : आमदार विजय रहंगडाले
RELATED ARTICLES






