Monday, January 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedखडकी (डोंगरगाव) येथे बिबट्याचा थरार; चार वर्षांच्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला

खडकी (डोंगरगाव) येथे बिबट्याचा थरार; चार वर्षांच्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बिबट्याने चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला घरातून उचलून नेले, या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हियांश हा आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बातमी लिहितपर्यंत वन विभाग व पोलीस प्रशासन अद्याप घटनास्थळी दाखल झालेले नव्हते.

खडकी व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून याआधीही अनेकदा ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्याने आज एका निष्पाप जीवाला प्राण गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, पीडित कुटुंबाला तात्काळ मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments