खा. प्रफुल पटेल यांच्या मागणीला संज्ञान घेत नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश

0
344

गोंदिया : मागील दोन दिवसापूर्वी गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शहर व ग्रामीण भागातील खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. घरे व गुरांची गोठे यामध्ये पाणी शिरल्याने क्षतीग्रस्त झाली आहेत. काही ठिकाणी जीवित हानी झाल्याच्या दुःखद घटना घडल्या. शेतातील धान पिके, फळबागा, भाजीपाला व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या सर्व घटनांच्या संज्ञान घेऊन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार श्री अनिल पाटील जी यांना पत्रव्यवहार व प्रत्यक्ष संपर्क करून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी या बाबीच्या त्वरित लक्ष घालून जिल्हाधिकारी, गोंदिया यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, गोंदिया यांनी आदेश काढून जिल्हा कृषी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांनी नुकसानीचे पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळावी कोणीही वंचित राहू नये यासाठी तात्काळ पंचनामा करण्याचे आज आदेश काढले आहे.

माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी पूर पिढीत क्षेत्राचा दौरा करून खासदार श्री प्रफुल पटेलजी, पालकमंत्री श्री धर्मराव बाबा आत्राम व मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील जी यांना जिल्हयात झालेली नुकसान व पूर परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. खा. श्री प्रफुल पटेल यांनी सदैव नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे दाखवून देत मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्रालयाने जिल्हाधिकारी, गोंदिया यांना तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here