Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedखेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला तिसºयांदा अंजिक्यपद

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला तिसºयांदा अंजिक्यपद

गोंदिया : देशातील प्रतिभासंपन्न युवा पिढीला त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी खेलो इंडीया युथ गेम्स या क्रीडा स्पधेर्चे आयोजन देशात करण्यात येत आहे. यावर्षी 5 व्या खेलो इंडीया युथ गेम्स 2022-23 चे आयोजन मध्यप्रदेश राज्यामार्फत 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सहभाग घेतलेल्या एकुण 24 क्रीडा प्रकारांपैकी राज्यास 20 क्रीडा प्रकारामध्ये 56 सुवर्णपदके, 55 रौप्यपदके व 50 कांस्यपदके अशी एकुण 161 पदके प्राप्त झाली असून 5 व्या खेलो इंडीया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये समावेश करण्यात आलेल्या 27 क्रीडा प्रकारापैकी महाराष्ट्र राज्याने 24 क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविलेला होता. या 24 क्रीडा प्रकारांमध्ये एकुण 384 खेळाडू व 113 क्रीडा मार्गदर्शक व्यवस्थापक, सहाय्यक कर्मचारी वर्ग, अधिकारी व पदाधिकारी यांचा सहभाग होता. या सर्व खेळाडूंचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी अभिनंदन केले. राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले असुन खेळाडूंना मुलभुत कौशल्यापासुन तर पारंगत दजार्चे प्रशिक्षण व त्याकरीता आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नविन क्रीडा विकास आराखडा तयार करीत असल्याचे सांगितले. या आराखडयाच्या आधारावर काम करून येणाºया काही वर्षात राज्यातील खेळाडू आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने पदके जिंकतांना दिसतील असा विश्वास व्यक्त केला. गुवाहाटी, आसाम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या तिसºया खेलो इंडीया युथ गेम्स 2020 मध्ये एकुण 20 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 78 सुवर्ण पदकांसह एकुण 256 पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले होते तर 68 सुर्वण पदकासह एकुण 200 पदके प्राप्त करून हरियाणा द्वितीय स्थान प्राप्त केले. हरियाणा (पंचकुला) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या 4 थ्या खेलो इंडीया युथ गेम्स 2022 मध्ये एकुण 25 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 52 सुवर्ण पदकांसह एकुण 125 पदके प्राप्त करून महाराष्ट्राने द्वितीय स्थान प्राप्त केले होत. नुकत्याच मध्यप्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 5 व्या खेलो इंडीया युथ गेम्स 2022 मध्ये एकुण 27 क्रीडा प्रकारांचा सहभाग होता. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 56 सुवर्ण पदकांसह एकुण 161 पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्याने प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे तर 41 सुवर्ण पदकासह एकुण 128 पदके प्राप्त करून हरियाणाने द्वितीय स्थान प्राप्त केले आहे.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments