Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedगाव विकासात महिलांचे योगदान महत्वाचे : अतिरिक्त मुकाअ लोखंडे

गाव विकासात महिलांचे योगदान महत्वाचे : अतिरिक्त मुकाअ लोखंडे

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे तपासणी
गंगाझरी, नहरटोला, तुमखेडा(बु.), शिवणी ग्रामपंचायतींची केली तपासणी
गोंदिया : घराच्या प्रगतीसाठी त्या घराच्या महिलेचे योगदान जसे महत्त्वपूर्ण ठरते, त्याचप्रमाणे जर गावाचा संपूर्ण विकास साधायचा असल्यास त्या गावांतील महिलांचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी दिनांक ९ जुलै रोजी नहरटोला येथे बचतगटांच्या महिलांना मार्गदर्शन करताना केले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा अन्वये जिल्हास्तरीय तपासणीच्या अनुषंगाने गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत गंगाझरी, तिरोडा तालुक्यातील नहरटोला, गोरेगांव तालुक्यातील तुमखेडा तसेच आमगाव तालुक्यातील शिवणी या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या वतीने दिनांक 9 जुलै रोजी तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय तपासणी समिती अध्यक्ष म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, समिती सदस्य सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आनंदराव पिंगळे, समिती सदस्य प्रतिनिधी आरोग्य विभागाचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, स्वच्छ भारत मिशन जिल्हा कक्षाचे शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार भागचंद्र रहांगडाले, महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रतिनिधी रियाज शेख, अभियंता राजेंद्र सतदेवे, अभियंता आशिष अडमे उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने गंगाझरी येथे जिल्हा परिषद सदस्या अश्विनी ताई पटले, पंचायत समिती सदस्या वंदना प्रकाश पटले, समूह समन्वयक कांचन मेश्राम, तिरोडा तालुक्यातील नहरटोला येथे गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, पंचायत समिती उपसभापती हुपराज जमाईवार, विस्तार अधिकारी(पंचायत) शितेश पटले, बाळू भाऊ भगत, समूह समन्वयक अनुप रंगारी, गोरेगांव तालुक्यातील तुमखेडा येथे गटविकास अधिकारी शुभम जाधव, सहायक गटविकास अधिकारी एच.व्ही. गौतम, विस्तार अधिकारी जयप्रकाश बोरकर, विस्तार अधिकारी चुंचूनवार, गटसमन्वयक सुभाष बोहरे, समूह समन्वयक नीलकमल डहाट, आमगाव तालुक्यातील शिवणी येथे जिल्हा परिषद सदस्या छबूताई उके, गटविकास अधिकारी अरुण गिरहेपुंजे, विस्तार अधिकारी कुटे, के.एम.रहांगडाले, गट समन्वयक गांधी पटले उपस्थित होते.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2023-24 अंतर्गत 53 जिल्हापरिषद गटातून प्रथम आलेल्या 53 ग्रामपंचायतीमधून गुनानुक्रमे 9 ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून करण्यात आली. यात सालेकसा तालुक्यातील दर्रेकसा, देवरी तालुक्यातील सावली, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगांव, सिलेझरी, सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा, गोरेगांव तालुक्यातील तुमखेडा बु., आमगाव तालुक्यातील शिवनी, गोंदिया तालुक्यातील गंगाझरी तसेच तिरोडा तालुक्यातील नहरटोला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीपैकी जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या तसेच तीन विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक ६ लाख, द्वितीय ४ लाख तर तृतीय पारितोषिक ३ लाखांचे देण्यात येणार आहे. विशेष पुरस्कार म्हनून प्रत्येकी ५० हजारांचे पुरस्कार रक्कम देण्यात येणार आहे.नहरटोला येथे बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी लघु उद्योग सुरू केला असून दुधापासून पनीर बनविण्याचे काम त्यांनी हाती घेऊन गाव विकासाला चालना देण्याचे काम केले आहे.
त्याचप्रमाणे शिवणी येथील बचतगटांच्या महिलांनी ही लघु उद्योगाच्या माध्यमातून गाव विकासात मोलाचे योगदान देत आहेत. यावेळी त्यांच्याशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आनंदराव पिंगळे यांनी संवाद साधत गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments