गुमाधावडातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
177

तिरोडा : तालुक्यातील गुमाधावडा येेथील अनेक नागरिकांनी खा.प्रफुल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय, गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये शिवसेना महिला तालुका अध्यक्षा स्नेहा देशभ्रतार यांच्या सोबत संध्या भालाधरे, रंजीता भालाधरे, दुर्गा नागदेवे, प्रतिमा राउत, शुभेच्छा नागदेवे, सरस्वता नागदेवे, रोहित ठाकरे यांनी पक्षाचा दुपट्टा वापरून माजी आमदार  राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश बावनथडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक धोरणांवर व सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशामुळे या तालुक्यात निश्चितच संघटन शक्ती वाढेल व पक्ष मजबूत होणार असून सर्व प्रवेशितांना पुढील वाटचालीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, जगदीश बावनथडे, योगेंद्र भगत, राजू ठाकरे, अल्केश मिश्रा, हर्षवर्धन मेश्राम सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here