गोंदिया : गडचिरोली, भंडारा,यवतमाळ,चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर हे भूकंपाचे केंद्र आहे. जिल्ह्यात आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल आहे. जिल्ह्यात सध्याच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची झालेली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेता येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
गोंदिया, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, 5.3 रिश्टर स्केलची नोंद
RELATED ARTICLES






