गोंदिया शहरात उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा

0
227

गोंदिया : शहरात ९ आँगस्टला जागतिक आदिवासी दिन समाजबांधवांनी उत्साह आणि संस्कृतीचा सुंदर संगम साधत पारंपरिक वादन आणि पारंपरिक पोशाखांमध्ये सजलेल्या समाजबांधवांनी रॅली काढून साजरा केला. शहराच्या विविध मार्गाने रॅली निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मरारटोली येथे कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
समारोपीय कार्यक्रमात जननायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माजी आमदार राजेंद्र जैन व उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी समाजबांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून समाजाबांधवांच्या विविध समस्या व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असून समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक ते प्रयत्न व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी आणि गोंदिया येथे वस्तीगृहाची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करू असे त्यांनी सांगितले. समारोपीय कार्यक्रमाला सर्वश्री राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, राजकुमार हिवारे, करण टेकाम, धनराज तुमडाम, घनश्याम तोड़सांम, विनोद पंधरे, नीलकंठ चीचाम, प्रमिला सिंदरम, राधिका सलामें, संगीता पूसाम, तोशमा तोड़साम, अनिल वट्टी, दुष्यंत किरसान, वाय .सी. भोयर, मीनाक्षी वट्टी, दिलेश्वरी मरास्कोल्हे, शत्रुघ्न मरास्कोल्हे, राहुल येले, निखिल बसोंड, अजय कोटिवार, जगदीश मड़वी, रूपराज कोड़पे, कमलेश मेश्राम, बालू मोरघडे, पंकज चौधरी, डिगीसिंग मड़वी, सुरेश परतेती, राजू मरस्कोल्हे , विकी टेकाम, राजा टेकाम, विनय मरकाम, संतोष मड़वी, योगेश सराटे, वंदना टेकाम, ललिता तराम, एच.सी. भोयर, कडाम सर, कोल्हारे सर, वनिता चिचाम सहित मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here