गोंदिया : गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री – लाडली बहन योजनेचे लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याकरिता माननिय खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशानुसार, माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन त्यांच्या मार्गदर्शनात स्वतंत्र प्रभार देण्याबाबतचे निवेदन उप विभागीय अधिकारी, गोंदिया यांना निवेदन देण्यात आले.
नुकतीच महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री – लाडली बहन योजनेची घोषणा केली. राज्यातील महिलांना व मुलींना सोयी – सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती, सशक्तीकरणाला चालना देणे, महिलांचे आरोग्य, पोषण आणि आर्थिक स्वावलंबन व आत्मनिर्भर व्हाव्यात या हेतूने या योजनेची १ जुलै पासून अंबलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना राज्याचा अधिवास दाखला, तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, बँक खाते सह अन्य कागदपत्रे आवश्यक आहे. परंतु या योजनेचा अर्ज सादर करण्याचा अंतिम कालावधी १५ जुलै असल्याने अनेक लाभार्थी मुख्यमंत्री – लाडली बहन योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री – लाडली बहन योजनेच्या अंबलबजावणी करीता स्वतंत्र प्रभार देऊन एक अधिकारी त्वरित नियुक्त करण्यात यावा व या योजनेपासून लाभार्थी वंचित राहणार नाही याकरिता योग्य अंबलबजावणी करण्यात यावी या संबंधीचे निवेदन गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने उप विभागीय अधिकारी, गोंदिया यांना देण्यात आले. यावेळी सर्वश्री नानू मुदलियार शहर अध्यक्ष, खालिदभाई पठाण, राजू भगत, संजय सोनुने, झनकलाल ढेकवार, टी. एम. धुवारे, तरंग जायसवाल, अनुज जायसवाल, राजेश वर्मा, तुषार उके, शरभ मिश्रा, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे यांच्या सह कार्यकर्ता उपस्थित होते.
गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री – लाडली बहन योजनेकरिता स्वतंत्र प्रभार देण्याबाबत उप विभागीय अधिकारी यांना निवेदन
RELATED ARTICLES






