गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रगतीसंदर्भात  खासदार प्रफुल पटेल यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा

0
220

गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील नव्या इमारतीच्या प्रगतीविषयी आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.श्री. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त, तसेच खासदार श्री. प्रफुल पटेल यांनी उपस्थित राहून सविस्तर चर्चा केली. खासदार श्री. प्रफुल पटेल यांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेत उच्च दर्जाचे व वेळेत पूर्ण होणारे बांधकाम करण्यावर भर दिला. त्यांनी गोंदिया जिल्ह्यासाठी ही सुविधा म्हणजे एक वैद्यकीय व आरोग्यविषयक मैलाचा दगड ठरणार असल्याचे स्पष्ट केले.

या योजनेअंतर्गत 690 कोटी रुपये निधीतून कुडवा येथे अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये 400 खाटांची रुग्णसेवा, आधुनिक ICU, MCH युनिट, ऑपरेशन थिएटर तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र, संवादात्मक अध्यापन कक्ष यांचा समावेश असणार आहे. सध्या 150 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयात भविष्यात विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात येणार असून, यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. गोंदिया येथिल शासकीय वैद्यकीय इमारत बांधकामाला वेग येईल व उत्तम व दर्जेदार बांधकाम होईल असा विश्वास यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here