Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोवंश जनावरांच्या मांस विक्री करण्यार्यांवर केशारी पोलीसांची कार्यवाही

गोवंश जनावरांच्या मांस विक्री करण्यार्यांवर केशारी पोलीसांची कार्यवाही

गोंदिया : पो.स्टे. केशोरी हद्दीत काही इसम बेकायदेशीररीत्या गोवंश जनावराचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगुन आहेत अशी गोपनिय माहीती मिळाली. सदर माहीतीवरुन मा. वरीष्ठांचे मार्गदशनात केशोरी पोलीस विनाविलंब ग्राम तुकुम/नारायण येथे जावुन जितेंद्र राऊत यांचे राहते घरी छापा टाकला असता त्यांचे घरी गोवंश जनावराचे अंदाजे ४० कि.ग्र. मांस किंमती एकुण ६०००/- रु.चा माल मिळुन आला. त्यावरुन जितेंद्र राऊत यांचे सह केशोरी येथील आत्माराम चौरे, सतिश वासनिक यांचेविरुध्द विवीध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री नित्यानंद झा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेक पाटील, मा. पोलीस निरीक्षक श्री गणेश वनारे यांचे मार्गदर्शनात पोउपनि हर्षल भोळे, पोहवा होळी, राऊत, निकोडे, मपोना सुखदेवे, पोशि भेंडारकर, डुंबरे, वाहन चालक अन्वर, पुस्तोडे, यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि गणेश आंधे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments