ग्रामपंचायत ढाकणीने केली तंबाखूविरोधात जनजागृती

0
169

गोंदिया. तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0′  अभियान दरम्यान जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, विविध कार्यालये तंबाखूमुक्त करणे आणि तरुणांमध्ये तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
तंबाखु व्यसन व धुम्रपान बाबतची जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात राष्ट्रीय तंबाखु नियत्रंण कार्यक्रमाच्या अनुशंगाने विशेष पथक के.टी.एस.शासकीय सामान्य रुग्णालय येथे कार्यरत आहे. पथकामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी तंबाखू मुक्तीसाठी विविध कार्यक्रमे व उपक्रमे राबविली जात आहे. ज़िल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय तंबाखु नियत्रंण कार्यक्रमातील जिल्हास्तरीय पथकाने दि.19 डिसेंबर रोजी गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत ढाकणी येथे भेट देवुन तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0′  अभियान व कोटपा कायद्याविषयी माहीती देवुन तंबाखू मुक्त गाव करण्याविषयी मार्गदर्शन केले. तंबाखू मुक्त गाव घोषित करण्याचे निकष समजावून सांगण्यात आले.कोटपा कायदा  २००३ अंतर्गत कलमांची माहिती पुस्तिका व जनजागृती साहित्ये सरपंच भावना पालांदुरकर यांना देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड,मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम,सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर,दंत तंत्रज्ञ यश जयस्वाल,दंत सहाय्यक विवेकानंद कोरे उपस्थित होते.

ग्रामपंचायतींमधील तंबाखू जनजागृतीच्या बातम्यांचे काही मुख्य मुद्दे
विक्रीवर नियंत्रण: अन्न व औषध प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना तंबाखू आणि गुटख्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले जातातज्यामुळे ग्रामसभांमध्ये यावर चर्चा होते.
जनजागृती मोहिम: तंबाखूविरोधी दिनानिमित्त आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतींच्या मदतीने गावोगावी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातातज्यात तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती दिली जाते.
तंबाखूमुक्त युवा अभियान: युवा पिढीला तंबाखूपासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्त युवा अभियान‘ सारखे उपक्रम राबवले जातातजे तंबाखूमुक्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आरोग्य विभागाची कारवाई: सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते आणि ग्रामपंचायतींना यासंबंधी नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here