चोरीस गेलेल्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद, शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

0
260

गोंदिया : फिर्यादी सतिश शामलाल कावळे, रा. खमारी ता. जि. गोंदिया, हे रिलायन्स जियो बेस सेंटर गोंदिया येथे टेक्नीशियन म्हणुन काम करतात… दिनांक २३/०४/२०२४ रोजी यांनी जियो बेस सेंटर मधील ए. सी. मशीन बंद पडल्याने त्यांनी ए. सी. मंशीन चे आऊटडोर युनीट ची पाहणी केली असता युनीट मध्ये लागलेले ०१) ०१ इंचीचे ३० मीटर ताब्यांचे पाईप ०१ नग, व ०२) १.५ इंचीचे ३० मीटर ताब्यांचे पाईप ०१ नग असा एकुण ६० मीटर ताब्यांचे पाईप असा एकुण किंमती ७०,०००/-रु. चा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरुन नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो. स्टे. गोंदिया शहर येथे *अप क्र. २६३/२०२४ कलम ३७९ भादंवी. अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते

वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. किशोर पर्वते, पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेवुन आरोपी- योगश गोविंदराव उगेमुगे, वय- ३२ वर्षे, रा. बजाज वार्ड, मरघट रोड, गोंदिया याला ताब्यात Urban त्याचेकडे कसुन तपास करुन चोरीस गेलेले मुद्देमाला पैकी पेचकलेले तांब्याचे पाईपचे तुकडे अंदाजे २५ मीटर कि. २७,०००/- रु., व ०२) ताब्यांवे तार वजन अंदाजे ०५ किलो, कि. ५,०००/- रु. असा एकुण किंमत- ३२,०००/- रु. चा मुद्देमाल* हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहवा – कवलपालसिंग भाटीया पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर, मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर चे पोलीस निरिक्षक श्री. किशोर पर्वते, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशिकांत लोंदासे, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here