जबलपूर रायपूर इंटरसिटी तसेच इतवारी बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा सालेकसा येथे देण्यात यावा, खासदार प्रफुल पटेल यांना निवेदन

0
299

गोंदिया : सालेकसा येथील नागरिकांची बहुप्रतिक्षित असलेली मागणी सालेकसा रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक 12855/12856 इतवारी बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस चा थांबा स्टॉपेज देण्यासाठी तसेच नवीन घोषणा करण्यात आलेली जबलपूर रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेस चा स्टॉपेज सुद्धा सालेकसा स्थानकावर देण्यात यावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस सालेकसा च्या वतीने निवेदन देण्यात आले. देशाचे नेते गोंदिया जिल्ह्याचे विकास पुरुष खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या गोंदिया निवास स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सालेकसा च्या वतीने बहुप्रतिक्षित असलेली मागणी सालेकसा रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक 12855/12856 इतवारी बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस चा थांबा स्टॉपेज देण्यासाठी तसेच नवीन घोषणा करण्यात आलेली जबलपूर रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेस चा स्टॉपेज सुद्धा सालेकसा स्थानकावर देण्यासाठी निवेदन देण्यात आले. ह्या विषयावर आपण रेल विभागाला पाठपुरावा करणार अशी सकारात्मक हमी दिली. ह्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन, माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. सदर निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ अजय उमाटे, शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, युवक तालुका अध्यक्ष बाजीराव तरोने, संतोष नागपुरे, संदीप मिश्रा यांच्या वतीने देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here