Monday, October 13, 2025
Google search engine
HomeUncategorizedजिलाधिकारी कार्यालय परिसरात वाघ, पहाटे करण्यात आले जेरबंद

जिलाधिकारी कार्यालय परिसरात वाघ, पहाटे करण्यात आले जेरबंद

गोंदिया : गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाघ दिसल्याने एकच दहशत निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच नागझिरा अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाची रेस्क्यू टीम घटनास्थळीत दाखल झाली व काही वेळातच त्या वाघाला रेस्क्यू करण्यात आले. ही घटना शनिवार, 11 ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान समोर आली. या वाघाला गोरेवाड़ा जू मध्ये पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ कमी होत असताना वाघ येथे स्थिरावत नसल्याने वन्यजीव प्रेमी देखील चिंतेत होते. दरम्यान, वाघांची संख्या वाढावी, या हेतूने वन विभाग जीव ओतून काम करीत आहे. त्यात विभागाला यश ही मिळत आहे. आता एनएनटीआरसह जिल्ह्यातील जंगलात वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चौफेर वाघाचे अस्तित्व आहे. त्यातच आता संरक्षित क्षेत्राबाहेरही वाघाचे अस्तित्व असल्याचे काही घटनांवरून पुढे आले आहे. त्यात शनिवारची रात्र गोंदियातील नागरिकांसाठी जागवणारी ठरली. वाघाने चक्क शहरात प्रवेश केला आणि एकच पळापळ झाली. शहरातील सारस चौकात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय असून याच परिसरात जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे निवासस्थान आहेत. दरम्यान, रात्री ११.३० वाजताच्या सुमारास याठिकाणी वाघ दिसला आणि एकच पळापळ झाली. याची माहिती वन विभागाला देण्यात आली यावर वन विभागाच्या आरआरटी पथकाने घटनास्थळ गाठून बचावकार्याला सुरुवात केली. तोपर्यंत जवळजवळ दीड ते दोन हजार लोक याठिकाणी जमले होते. त्यामुळे पोलिस पथकाला पाचारण करण्यात आले. पहिल्यांदाच वाघ शहरात निवासी भागात आल्याने बघ्यांची गर्दी वाढतच होती. त्यात रात्रीचा अंधार त्यामुळे वाघाला रेस्क्यू करण्यात अडचणी येत होत्या. नाईट व्हिजन थर्मल ड्रोन ने वाघाचा ठावठिकाणा शोधला आणि जेसीबी ने वाघापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता तयार केला. याठिकाणी निवासी घरे, कार्यालये असल्याने पथकाला हे रेस्क्यू ऑपरेशन्स राबवताना चांगलीच दमछाक झाली. मात्र, पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास या वाघाला बेशुद्ध करण्यात यश आले. वाघाला नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात स्थानांतरीत करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments