जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्वपूर्ण बैठक संपन्न

0
232

गोंदिया : तेजस्विनी लॉन, सडक अर्जुनी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत निवडणूक संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. सहकार क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, ग्राहक व सामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारी बँक व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व, चांगले प्रशासन आणि सुशासनासाठी सहकार पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा देत निवडून द्यावे असे आवाहन करीत खासदार श्री प्रफुल पटेल यांनी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन केले.
बैठकीस सर्वश्री राजकुमार बडोले, राजेंद्र जैन, शेषराव गिऱ्हेपुंजे, देवचंद तरोने, तेजराम मडावी, डॉ. अविनाश जायस्वाल, डॉ अविनाश काशीवार, विनोद कन्नमवार, रचना गहाणे, प्रिया हरिणखेडे, गजानन परशुरामकर, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे,रजनी गिऱ्हेपुंजे, वंदना डोंगरवार, लोकपाल गहाणे, आनंद अग्रवाल, राजू पटले,रूप विलास कुरसुंगे, रमेश चुऱ्हे, बाबुराव कोरे, प्रशांत बलसमवार, भोजराम रहिले, दानिश साखरे, दिनेश कोरे, महेंद्र वंजारी साहिस्ता शेख, सायना शेख, शशिकला टेंभुर्णेकर, कामिनी कोवे, दीक्षा भगत, शाहिस्ता शेख, सायमा शेख, वनिता कोरे, सोनाली ब्राह्मणकर, डॉ. महेश गिरीपुंजे, डॉ. दिलीप कापगते, रमेश गहाणे अनिल बिलिया, रमेश बडोले, सुधाकर पंधरे, धनु कोवे, भोला कापगते, आस्तिक परशुरामकार, माधव हटवार, रमेश गहाणे सहित महायुतीचे उमेदवार, मतदार, पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here