कंत्राटी आरोग्य सेविकांचा संप सुरूच
गोंदिया : राष्टÑीय आरोग्य मिशन अंतर्गत गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून सेवा पुरवित असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेवून 23 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील एका गरोदर मातेची प्रसूती घरीच झाली. यामुळे आता या प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
राष्टÑीय आरोग्य मिशन अंतर्गत गेल्या 15 पेक्षा अधिक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर आरोग्य सेविका सेवा पुरवित आहेत. तटपुंज्या मानधनात सेवा पुरवित असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचारी सेवेत कायम कररण्यात यावे, यासह अनेक मागण्यांना घेवून गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आश्वासनाच्या पलिकडे कंत्राटी आरोग्य सेविकांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित केले जात नाही. उलट राज्य सरकारने कंत्राटी आरोग्य सेविकांना सेवेतून कमी करण्याचा घाट रचला. या प्रकाराला घेवून कंत्राटी आरोग्य कर्मचाºयांनी 23 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. मुंबई येथे कंत्राटी आरोग्य सेविकांचे आंदोलन सुरू आहे. या अांदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य सेविका ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत.
जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली
RELATED ARTICLES