गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार इंजि.प्रकाश ताकसांडे यांनी प्रभारी कार्य.अभियंता सुमित बेलपत्रे यांच्याकडून स्विकारला. श्री.ताकसांडे यांनी या आधी गोंदिया जिल्हा परिषदेच्या सडक अर्जुनी उपविभागाचे उपविभागीय अभियंता व काही काळ प्रभारी कार्य.अभियंता म्हणून काम केले असल्याने त्यांना जिल्ह्याच्या बाबतीत माहिती आहे. सडक अर्जुनी येथून ते उमरेड येथे बदलून गेले. त्यानंतर त्यांची पदोन्नतीने बदली नागपूर येथे झाली. नागपूर येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना प्रशासकीय बदलीत गोंंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे.



