जि.प.शिक्षण सभापतीच्या भेटीत शिक्षण विभागातील 13 कर्मचारी आढळले गैरहजर

0
186

गोंदिया : गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कामकाजाला घेऊन अनेक तक्रारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापतीकडे आलेल्या होत्या.त्यातच दिवाळीच्या सुट्या आटोपल्यानंतर २४ आॅक्टोंबरपासून नियमित कार्यालय सुरु झाले असून या आठवड्याचे ३ दिवस लोटल्यानंतरही अनेक कर्मचारी रजा मंजुर न करता गैरहजर असल्याचे आज(दि.२९)शिक्षण विभागास शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी आकस्मिक दिलेल्या भेटीत उघडकीस आले.तब्बल १३ कर्मचारी अधिकृत रजा मंजूर न करताच गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.विशेष म्हणजे कार्यालयात शिक्षणाधिकारी यांच्यासह १ उपशिक्षणाधिकारी सुध्दा गैरहजर असल्याचे आढळून आल्याने जि.प.उपाध्यक्ष व शिक्षण सभापती हर्षे यांनी सर्वांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावे,यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून मागणी केली.

विशेष म्हणजे गैरहजर असलेल्या कर्मचा-यानी रजेचा अर्ज कार्यालयप्रमुखाकडे न सोपविता व्हाटसअप गृपवर घालून अर्ज मंजूर की नामंजूर याची पर्वा न करता सुट्टी घेतल्याने आज जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून आलेल्या अनेकांना परत जावे लागल्याची बाब जि.प.शिक्षण सभापती हर्षे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली.प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी,२ उपशिक्षणाधिकारी यांच्यासह ३२ वर्ग ३ व ४ चे कर्मचारी असा ३५ ची संख्या आहे.त्यापैकी ८-१० कर्मचारी हे शिक्षण विभागातून विविध विभागात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेले आहेत.त्यांना वगळून १३ कर्मचारी हे आज बुधवारला रजा मंजुर न करता गैरहजर होते.त्यातही शिक्षणाधिकारी यांचेकडे रजा मंजूरी एकही प्रकरण सादर नसल्याने कर्मचा-याची रजा मंजूर झालेली नाही.

शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया या विभागाचे कर्मचारी, कार्यालय प्रमुखाकडुन रजेचा अर्ज मंजूर न करता विना परवानगीने परस्पर वाटसॉप ग्रुपमध्ये रजेचा अर्ज टाकुन रजेवर जात असल्यामुळे कार्यालयीन नियमित कामे पदोन्नती नस्ती, रोस्टर अध्यावत करणे, चटोपाध्याय, निवडश्रेणी प्रकरणे,भविष्य निर्वाह निधी, एनपीएस/डीसीपीएस, हायस्कुल व कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षकांचे रोष्टर अध्यावत करणे, असे अनेक कामे प्रलंबीत आहेत. तसेच शिक्षकांचे नियमित वेतन देयक, कार्यालयाचे आस्थापना वरिल कर्मचा-यांचे वेतन देयके अद्याप तयार करण्यात आलेले नाही.त्यामुळे शिक्षण विभागातील सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी दिनांक ३० आँक्टोंबरला सकाळी ९.४५ वाजता नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे.जे अधिकारी / कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार नाही त्यांच्यावर प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगनांथम यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उद्या गुरुवारला(दि.३०) किती अधिकारी कर्मचारी पालन करतात याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here