गोंदिया : तिरोडा – खैरलांजी मार्गावर भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पायी फिरत असलेल्या अलमचंदानी यांचा मृत्यू झाला तर मोटार सायकलवरील तीन जण जखमी झाले असून यातील एक इसम गंभीर झाला आहे. गुरुवारी रात्री 10.15 वाजताच्या सुमारास संत कवलराम वार्ड, सिंधी कॉलनी तिरोडा येथील रहिवासी संतोष द्वारकादास आलमचंदानी (51 वर्ष) हे आपले पत्नीसह जेवण झाल्यानंतर रस्त्याचे कडेने फिरत असता अचानक मागेहून भरधाव वेगाने आलेली अवेंजर दुचाकी क्रमांक एम. एच. 31 / इडी 5687 ने शिवमंदिर जवळ संतोष आलमचंदानी यांना जबरदस्त धडक दिली. यात संतोष आलमचंदानी हे सिंमेट रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरीता नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अमित वानखडे आपले चमूसह घटनास्थळी पोहचून मोटार सायकल वरील जखमी तिघांना उपचारा करता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवून मृतकाचे भाऊ हरीश द्वारकादास आलमचंदानी यांचे तक्रारीवरून मोटार सायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार ब्रिजेश मडावी, शैलेश दमाहे व विक्की धांडे करीत आहेत.
जेवल्यानंतर पत्नीसह फिरावयास गेलेल्या पतीचा दुचाकीच्या घडकेत मृत्यू
RELATED ARTICLES