टिएचओ डॉ.कांबळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगाव येथे आकस्मिक भेट

0
223

गोंदिया : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रान्वये जिल्हा व तालुका स्तरिय अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थाना भेटी देवुन तेथील स्वच्छता व सुरक्षा,औषध उपलब्धता,वैद्यकीय सुविधा,रुग्णांसमवेत सुसवांद याबाबत निर्देशकांची पाहणी करण्याच्या सुचना दिल्यात.त्या अनुशंगाने दि.10 जुन रोजी अर्जुनी मोरगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे यांनी अतिदुर्गम जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगाव येथे आकस्मिक भेटी देवुन कामकाजाची पाहणी केली. त्यावेळी त्यांचे सोबत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सुरेश धुर्वे, विलास कारेवार,दिपक चव्हाण उपस्थित होते.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र गोठ्णगाव येथील प्रसुतीगृह,प्रयोगशाळा, आंतररुग्ण वार्ड,औषधी साठा,लस साठवणुक केंद्र ई.ची पाहणी करुन लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना वैद्यकिय अधिकारि यांना देण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे,सर्व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देण्यात याव्यात,क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी देवुन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात यावा,हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडावे.सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी.कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,जैविक घन कचरा व्यवस्थापन योग्य करणे,जनआरोग्य समीतीच्या सभा नियमीत घेणे,कुपोषित अंगणवाडीतील बालकांचे तपासणी करुन कुपोषित बालकांना श्रेणीनुसार वर्गीकरण करुन आवश्यक असल्यास ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथिल एन.आर.सी. केंद्रावर भर्ती करण्याच्या सुचना दिल्या,टेलिकंन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकारी मार्फत योग्य नियोजन करणे,गरोदर मातेला प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात नियमित सेवा देणे,पत्ता सिजन स्थलातंरित लोकांची आरडीके किट ने मलेरिया बाबत तपासणी करणे,अंगणवाडीतील बालकांची नियमित तपासणी व आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बाबत विविध सुचना दिल्यात.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर,डॉ. स्नेहल गायकवाड यांचेसह आरोग्य संस्थेतील संपुर्ण स्टाफ व कर्मचारी वर्ग त्यात आरोग्य सहाय्यक सुरेश पारधी,आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर, फार्मासिस्ट मुकुल बडवाईक,स्टाफ ब्रदर चिरायु वावरे,आरोग्य सेविका प्रमिला रॉय,आरोग्य सेवक सैय्यद,परिचर बंडु उईके, स्वच्छक कुमुद शहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here