Wednesday, October 30, 2024
Google search engine
HomeUncategorizedडॉ. सुगत चंद्रिकापुरेंचा शक्तिप्रदर्शन, आमदार बच्चुभाऊ कडू यांचा रोड शो

डॉ. सुगत चंद्रिकापुरेंचा शक्तिप्रदर्शन, आमदार बच्चुभाऊ कडू यांचा रोड शो

गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची राष्ट्रवादी कांग्रेस महायुतीने ऐनवेळी उमेदवारी कापल्याने या अन्यायाविरोधात बंड पुकारुन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपला मुलगा डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांना पुढे करुन अर्जुनी मोर विधानसभेच्या आखाड्यात उतरवीले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवसी हक्काचा माणुस डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रहार पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चु कडु, आमदार मनोहर चंद्रिकापुरे व प्रहार चे स्वतंत्र उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या रॅली सह अर्जुनी मोर. शहरात रोड शो केला.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवसी अर्जुनी मोर. शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत प्रहार संघटनेकडुन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रशन्न लॉन अर्जुनी मोर. येथुन ढोल ताशांच्या गजरात प्रचंड आतषबाजीत अभुतपूर्व रॅलीला सुरवात झाली. खुल्या गाडीत आमदार बच्चुभाऊ कडु, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, स्वतंत्र उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी आपल्या परिवारासह हजारो महीला पुरुष व कार्यकर्त्यांसह शहराचे मुख्य मार्गाने महाराणा चौकापर्यंन्त अभुतपूर्व रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
http://panchyatkhabar.com/wp-content/uploads/2023/03/ad1-e1679401545250.jpg

Most Popular

Recent Comments