तलावात शिंगाडे तोडण्यास गेलेल्या 55 वर्षीय इसमाचा डोंग्यावरून पडून मृत्यू

0
112

इलेक्ट्रिक पावर हाऊसजवळील मल्हारी तलावातील दुर्दैवी घटना
गोंदिया: आमगाव शहराजवळील इलेक्ट्रिक पावर हाऊस परिसरात असलेल्या मल्हारी तलावात आज सकाळी शिंगाडे तोडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय युवकाचा डोंग्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक नामे सुखदेव कुवरलाल दूधबर्वे वय 55 वर्षे राहणार माल्ही. हा इसम तलावात शिंगाडे तोडण्यासाठी डोंगा घेऊन गेला होता. मात्र, काम करत असताना अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला. तो बाहेर निघू शकला नाही त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून सवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवण्यात आले असून पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here