तिरोडा नगर परिषदेवर राजेशजी गुनेरिया उपाध्यक्ष पदी तर अजयजी गौर स्वीकृत सदस्यपदी निवड

0
234

गोंदिया : स्थानिक राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तिरोडा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीचा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या निवडीमध्ये मा. श्री राजेशजी गुनेरिया यांची उपाध्यक्षपदी, तर मा. श्री अजयजी गौर यांची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

*जगदीश(बालू) बावनथडे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव*

या निवडीचे स्वागत करत *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालू) बावनथडे* यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

शुभेच्छा देताना बावनथडे म्हणाले की, “मा. श्री राजेशजी गुनेरिया आणि मा. श्री अजयजी गौर हे दोन्ही अनुभवी आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद शहरात अधिक मजबूत झाली आहे. तिरोडा शहराच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी हे दोन्ही पदाधिकारी कटिबद्ध राहतील, याची मला खात्री आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here