तुमसर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

0
258
आरोग्यम धनसंपदा चा मंत्र आपल्याला सुदृढ आरोग्याकडे नेतो : जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले
गोंदिया : १ कोटी १५ लक्ष रुपयांच्या निधीतून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भूमिपूजन तुमसर येथे संपन्न झाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवेवर विशेष लक्ष दिले असून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. रोग झाल्यावर उपचार यापेक्षा रोगच होऊ नये या दृष्टीने  मोदीजी कार्य करीत आहेत. डायरिया, मलेरिया तसेच पावसाळ्यात होणारे रोग कमी करण्यात शासनाला यश प्राप्त झाले आहे. देशात उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांमुळे होणारे रोग कमी झाले कारण शौचालय बांधकामाचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. सोबतच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा प्रक्रिया, सांडपाणी नदीत वाहून न जाऊ देता त्यावर प्रक्रिया करून सोडणे यामुळे नद्या सुद्धा प्रदूषणापासून वाचत आहेत. तुमसरला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावे ही मागणी आणि इच्छा व्यक्त करण्यात आली होती. आणि आज याचे भूमीपूजन करताना फार आनंद होत आहे असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी यावेळी व्यक्त करत लवकरच कार्य पूर्ण होऊन लोकार्पण पण करू असा आशावाद व्यक्त केला. यावेळी क्षेत्राचे आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे, यशवंत गणवीर उपसभापती जिल्हा परिषद गोंदिया, डॉ. लक्ष्मण भगत जिल्हा परिषद सदस्य, रामेश्वर महारवाडे पंचायत समिती सदस्य, योगिताताई देशमुख सरपंच, विजय सहारे उपसरपंच, नरेश कोहरे उपसरपंच मेंढा, कल्पनाताई बहेकार माजी सरपंच, सुरेश रहांगडाले, जगणीत सर आणि क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here