तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजूर महिलेला सर्पदंश

0
289

गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम पिंडकेपार गोटाबोडी येथील जंगल शिवारात माहेरी येऊन तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या मजूर महिलेला काल सायंकाळी ५ वाजे दरम्यान विषारी सापाने दंश केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील मजूर वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच तेंदूपत्ता संकलन करणे नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होत असून सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव ज्योति राजकुमार साखरे वय ३६ राह. तुमसर, तेढा असे आहे. सविस्तर वृत्त असे की, सदर महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी देवरी तालुक्यातील पिंडकेपार / गो. माहेर गावी आली. स्थानिक पिंकेडपार/गो. या जंगल शिवारात (ता.१३) मे रोजी सोमवारला दुसऱ्या फेरीत सायंकाळच्या सुमारास तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता, विषारी सापाने दंश केला. सदर महिलेची प्रकृती स्थिर असून, गोंदिया येथील बजाज हॉस्पिटल या ठिकाणी सध्या उपचार सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्याचे हंगाम जोरात सुरू असून, अधिकाधिक प्रमाणात तेंदूपत्ता संकलित करता यावा याकरिता मंजूर वर्ग अगदी पहाटे ४ वाजल्यापासून तर सायंकाळी दुसऱ्या फेरीत ७ पर्यंत जंगलात असतात या दोन्ही वेळेला जंगलात वन्य प्राण्यांची वर्दळ असते त्यामुळे अगदी पहाटे न जाता दिवस निघल्यावर शक्य झाल्यास समुहाणे जावे तसेच सायंकाळच्या सुमारास अधिक वेळ जंगलात थांबू नये अशा सूचना आणि आवाहन देवरी वन विभागाच्या वतीने मंजूर वर्गाला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here